रवा इडली डोसा ऐकली असेल .. रव्याचा शिरा किंवा उपमा वगैरे पण आपण लहान पणापासून खात आलो .. अगदी गेला बाजार रव्याचे कटलेट किंवा काही महाभाग रव्याचा केक पण बनवतात असं मी ऐकलंय .. पण रव्यापासून चहा कोणी बनवल्याचं ऐकलं आहे का .. मी ऐकलं .. पहायचा योग थोडक्यात हुकला .. पण जेवता जेवता ऐकल्या मुळे हसून आणि नंतर ठसका लागुन माझेही बरेच हाल झाले ..
तर ही किमया साधली होती माझ्या प्रिय रूम -मेट्स विनया आणि वृषालीने .. सुरवात अशी झाली.. मी kansas ला गेले होते.. इकडे NJ मधे घरी या सगळ्यांनी एक पार्टी ठेवली होती . त्या निमित्ताने साफसफाई मोहीम सुरु होती .. US मधे आम्हाला आपल्या इथे मिळते तशी साखर मिळत नाही .. पावडर वाली मिळते.. किचन मधे मी इकडे येताना आणलेले बरेच पुडे ठेवले होते त्यात एक पुडा साखरेचा होता.. म्हणजे विनयाच्या मते होती .. मीनाक्षी च्या मते नव्हती .. तर विनयाला पूर्ण खात्री कि ती साखरच आहे, आणि मी वर काढायला विसरले.. तिनी एकदम excite होत, तो साखरेच्या डब्यात रिकामा केला..
पार्टी संपली आणि सोमवार उजाडला. वृषाली आमच्यातली सगळ्यात गुणी मुलगी आहे. I mean गृहकृत्य दक्ष :) सकाळी सकाळी बरेचदा पहाटे उठून चहा बनवते .. तिनी पण मस्त पैकी चहा बनवला नेहमीसारखा आलं वगैरे घालून. थोडा पिऊन पाहिला तर कडू लागला म्हणून अजून साखर घातली. शेवटी बिचारी मला शिव्या घालत कडू चहा पिऊन ऑफिसला पळाली. मला अशा साठी शिव्या कि मी बरेचदा organic गोष्टी आणते. मग तिला वाटला कि त्यामुळेच चहा कडू झाला. बाकीचा तिनी विनया साठी भांड्यामध्ये ठेवला होता .. थोड्या वेळानी विनया उठून चहा गाळायला गेली.. तर काहीच येईना गाळणीतून.. मग मीनाक्षी पण आली.. मीनाक्षीची ट्यूब थोडी पेटली.." कि चहा मै कुछ रवा है " आणि मग तो रवाच असणार यावर शिक्का मोर्तब झालं ..आणि बिचारा रवा आता शिजून घट्ट झाला होता . तर अशा प्रकारे एक नवीन डिश तयार झाली .. रवा टी किंवा चहाचा उपमा :) पुढच्या वेळी फोडणी देऊन बघायला हरकत नाही :D .. अजून भारी प्रकार म्हणजे मी आल्यावर पाहिलं, तर त्या पुड्या वर लेबल पण होतं कि इडली रवा ..
हाहाहाहा .. मी प्रचंड हसून घेतलं, चिडवून घेतलं .. पोट दुखे पर्यंत..
बाकी या सगळ्यांच्या बरोबर वेळ इतका मस्त गेला, १९०३ गोथम मधे.. आम्ही Bachelor Life खऱ्या अर्थाने पुन्हा enjoy केलं ..
So, This one is for us girls.. .. वृषाली, विनया आणि मीनाक्षी आणि भाग्यश्री :)
Address : २५५ Warren St , Apt १९०३ , Jersey City , NJ ०७३१०