ये मेरा प्रेमपत्र पढ़कर तुम नाराज ना होना..
के तुम मेरी जिंदगी हो.. तुम मेरी बंदगी हो ..
वगैरे गाणी ऐकत मी मोठी झाले.. याचा अर्थ मला लहान पणापासून प्रेमपत्र लिहायचा शौक होता असा नाही.. हे गाणं आपलं लक्षात राहिलं. शाळेत असताना माझ्या वर्गातल्या एका मुलानी दुसरया वर्गातल्या मुलीला प्रेमपत्र लिहिलं होतं. कधी? तर ते चक्क चौथीत.. हिम्मत असते एकेकाची.. इथे प्रेमपत्र सोडा, साधं मला आवडणारया मुलाला ऑर्कुट/फेसबूक वर अँड करायची पण लवकर हिम्मत होत नाही. असो, शाळेत तर काही आम्ही त्या वाटेला गेलो नाही.. मग कॉलेज मधे तरी काही करावं तर कुठलं काय .. बारावी अँडमिशन वगैरे कीटक डोक्यात गेले होते, मग आम्ही अभ्यास करत बसलो.. फिजीक्स केमिस्ट्रीच्या नोट्स लिहिता लिहिता प्रेमपत्र काही लिहून झालं नाही.. काही पोरं-पोरी तेव्हा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असं काहीबाही बोलायचे. पण आम्ही.. हे काय वय असतं का प्रेम वगैरे करायचं गटात सामिल झालो. त्या वयात तेच करायचं असतं हे खूप वर्षांनी कळलं. एकदाचे 12 वी पार पडून गाडी इंजीनियरिंगच्या धक्क्याला लागली... इंजीनियरिंग अँडमिशन झाली पण ती गर्ल्स कॉलेज मध्ये..
धत ते री कि .. आता काय प्रोफेसर ला पत्रं लिहायची.. काही पोरींनी तेही उद्योग केलेच शेवटी. नाही म्हणायला कोचिंग क्लास मध्ये मुलं होती. मला 1- 2 आवडायची पण :) अरे पण त्यांना पत्रं बित्र.. बापरे !! घरी कळलं तर वगैरे शंका कुशंका.. शेवटी एकदाचं ते हि कॉलेज संपलं आणि कंपनी मध्ये प्रवेश केला.. COGNIZANT waw !!!
येस.. Here I am.. आजूबाजूला एकदम स्मार्ट लोकं दिसत होती.. खरं सांगायचं तर अशी काही खूप स्मार्ट नव्हती. पण त्या काचेच्या इमारतींमध्ये सगळेच मला उगीच स्मार्ट वाटत होते.. माझ्या ट्रेनिंग मधला एक जण पाहताक्षणी आवडला. आता काही पुढे जाणार तेवढ्यात कोणीतरी सांगितलं, तो ना तो सगळ्याच मुलींच्या मागे असतो.. झालं आम्ही त्याचा विचार सोडला. प्रोजेक्ट मिळाला तर प्रोजेक्ट मध्ये प्रेम करण्यालायक कोणी नव्हतंच..
प्रवेश करताना आईटी कंपनी बद्दल ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या एव्हाना चहाच्या मशीन मधे गेल्या होत्या, आणि टीम लीड नी या संधीचा फायदा उठवत कामाला जुंपल. 2 वर्षानी मात्र खडबडून जागं व्ह्यायला झालं. कारण मातोश्री जाग्या झाल्या होत्या.. ऑफिस मधे कोणी चांगला आहे का वगैरे असे प्रश्न आडून विचारले जाऊ लागले.. तेव्हा अमेरिकेला पलायन करावं असा धूर्त कावा डोक्यात आला. म्हणजे ते दाखवायला वगैरे नको कोणाला आणि चहा-पोहे नको.. पत्र लिहायचं स्वप्न असं ठरवलेल्या लग्ना मधे काही पूर्ण होणार नव्हतं, मंगल पत्रिकेवर नाव घालता येईल जास्तीत जास्त ....
नशिबानी साथ दिली आणि आमची स्वारी अमेरिकेत पोचली.. ईमेल वगैरे तर आता बोरिंग झालं होतं, मला लिहायचं होतं खरं खुरं पत्र, पण आता मात्र ते लिहिण्यायोग्य व्यक्ति हवी होती आता नुसतं पत्रं द्यायचं नव्हतं, तर ते मनापासून द्यायचं होतं, एकाला कोणाला तरी.. यूरेका!!!..आम्ही प्रेमात पडलो ..
या वेळी खरं-खुरं, त्याच्याशिवाय जगु शकत नाही असं वालं प्रेम. खात्री वाटत होती की हाच तो पत्र देण्यासाठी.. दिवसें दिवस जात होते, आणि मी त्याच्या विचारण्याची वाट बघत होते. त्यातच त्याचा वाढदिवस जवळ आला होता. मी आता कंबर कसली आणि प्रेमपत्र लिहिलंच. पण कुठे तरी इगो होताच, की त्यानी आधी सांगावं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून.. मी का सांगू . पण 1 आठवडा आधी त्याला ईमेल आला, की त्याला भारतात परत जावं लागणार आहे. Bday च्या आधी 2 दिवस. पण आम्ही भेटणार होतो त्याच्या जाण्या आधी. मी Bday कार्ड च्या पाकिटात ते पत्र ठेवलं.. आणि तयारी केली त्याला भेटण्यासाठी.. भेटलो.. 2 दिवसात खूप गप्पा मारल्या, फिरलो.. वेळ कसा गेला कळलंच नाही.. आता निघायची वेळ आली तरी हा का काही बोलत नाही.. शेवटी मी हळूच ते पत्र काढून नुसतं कार्ड त्याला दिलं.. फाटकं पाकिट पाहून त्याला थोड़ी शंका आली. पण पोरं तशीही थोड़ी मूर्खच असतात.. तर त्याला फार काही कळलं नाही..
मंडळी.. थोडं इमोशनल झालं का?.. तर ते पत्र मग तसंच राहिलं अमेरिकेत.. मी पण इकडे परत आले, आणि मग काही दिवसांनी त्यानी लग्नाचं विचारलं.. प्रेमपत्र नाही आणि काही नाही.. त्याला आता थेट लग्नपत्रिका लिहायची होती.. देवा.. पण प्रेम तर आंधळं असतं ना, तर आम्ही लग्न करून एकदाचे मोकळे झालो..
आता एक वर्ष झालं जवळजवळ लग्नाला.. पत्र लिहायचं राहूनच गेलं आहे.. शेवटी आता नवरयाला तरी लिहू Anniversary निमित्त.. म्हणून लिहायला बसले.. मेरी जान वगैरे लिहावं का.. त्याला शंका यायची जॉन कोण कुठला . अशा बरयाच काट छाट करत एकदाचं ते पत्र तयार झाले आहे .. आमची Anniversary आहे 19 Nov..त्याला अजुन 4 दिवस बाकी आहेत ..
तेव्हा आमच्या नशिबात योग आहे का नाही प्रेमपत्र द्यायचा.. हे लवकरच कळेल..
Till then keeping my fingers crossed ..